रत्नागिरी दि.13 : जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापनाबाबत चिपळूण तालुक्याचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, महावितरण चे अधीक्षक अभियंता नितीन पळसुलेदेसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग लक्ष्मीकांत जाधव, कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग जगदीश पाटील, कार्यकारी अभियंता चिपळूण सा.बां. अमरजीत रामशे, मुख्याधिकारी नगरपरिषद चिपळूण प्रसाद शिंगटे, प्रांत अधिकारी चिपळूण आकाश लिगाडे, परिक्षेत्र वनाधिकारी राजश्री कीर, तहसीलदार चिपळूण प्रविण लोकरे, गट विकास अधिकारी चिपळूण उमा घारगे पाटील, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी इत्यादी उपस्थित होते.
चिपळूण शहरातून वाहणाऱ्या वाशिष्टी व शिव नदीमधील गाळ काढण्याच्या कामाचा सुद्धा यावेळी आढावा त्यांनी घेतला. आणि मान्सून काळात सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना केल्या.
