लांजा : युवक मंडळ शिरवली यांच्या सौजन्याने मुंबईस्थित समाजसेविका सौ.कविता बोरकर आणि सारस्वत हितवर्धक मंडळ मुंबई यांच्या देणगीतून शिरवली गावातील इयत्ता पहिलीपासून पुढील महाविद्यालयीनपर्यंत शिक्षण घेत असलेल्या सुमारे १४० विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा स्तुत्य कार्यक्रम जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा शिरवली येथे नुकताच घेण्यात आला.
या कार्यक्रमप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. भावना भानू राजापकर, ग्रामपंचायत सदस्या सानिका कुळये, दीपाली गोबरे, रिया डिके, दक्षता राजापकर , युवक मंडळ शिरवलीचे पदाधिकारी विजय कुळये, विकास भारती, संदीप सातोपे, नितीन धुर्ये, प्रवीण डिके, कमलाकर राजापकर, योगेश कुळये, शैलेश जानस्कर, केतन राजापकर, संदीप सूद, जयेंद्र सूद,मुख्याध्यापक नंदकुमार गोतावडे, उपशिक्षक संदीप घोरपडे यांच्यासह गावातील शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसह पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
