मुंबई : मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार कालीदास कोळंबकर यांच्या पत्नी सौ. नम्रता कालीदास कोळंबकर( वय ६५) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
आम. कोळंबकर यांच्या पत्नी असल्या तरी त्या मतदारसंघातील प्रत्येक वार्डातील महिला मंडळ, फेरीवाले, पोलिस वसाहत आदी भागातील सामान्यांच्या त्या आधारवड होत्या. त्यांच्या निधनामुळे शोक व्यक्त होत आहे
त्यांच्या पश्चात पती, २ मुलगे नात असा परिवार आहे.
त्याचेवर सायंकाळी वाजता वडाळा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
