जयगडजवळ नदीत पोहायला उतरलेले तिघे बुडाले

एकाला वाचवण्यात यश ; बेपत्ता दुसऱ्याचा शोध सुरू

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील जयगड बंदरानजीक
वाटद सुतारवाडी येथील नदीत पोहायला उतरलेले तीन कामगार बुडाल्याची घटना बुधवारी रोजी दुपारी येथे घडली.
या या दुर्घटनेत विक्रम नरेश चंद्र(३४ मूळ रा.उत्तरप्रदेश), तरुणाचा बडून मृत्यू झाला आहे तर कोल्हापूर येथील ओमकार जाधव (रा. कोल्हापूर) पाण्यातून वाहून गेला असून त्याचा शोध सुरु असून यातील नायर नामक तरुणाला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले आहे.

वाटद येथील गाव नदी येथे पोहायला अनेकजण येत असतात. बुधवारी लावगण येथील हे तीन कामगार पोहण्यासाठी वाटदखंडाळा येथे गेले होते. मागील तीन दिवसांपासून तालुक्यात प्रचंड पाऊस सुरू आहे. नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अशातच काळजी न घेता वाटद येथे नदीत उतरलेल्या परप्रांतीय तरुणांच्या बाबतीत ही दुर्घटना घडली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE