सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये गोगटे-जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी पुन्हा एकदा निर्विवाद चॅम्पियन

मुंबई विद्यापीठ जिल्हास्तरीय महोत्सव

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग आयोजित युवा महोत्सव 2023 गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी (स्वायत्त) यावर्षी यजमानाच्या भूमिकेत होते या कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठ सांस्कृतिक समन्वयक श्री निलेश सावे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे श्रीमती शिल्पाताई पटवर्धन कार्याध्यक्षा रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी श्री सतीश शेवडे कार्यवाह रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी उपस्थित होते.

गोगटे जोगळेकर जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रफुल्लदत्त कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ मकरंद साखळकर तिन्ही शाखेच्या उपप्राचार्य डॉ. यास्मिन आवटे ,डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. चित्रा गोस्वामी , सांस्कृतिक विभाग प्रमुख आणि जिल्हा समन्वयक डॉ आनंद आंबेकर सह समन्वयक प्रा. संयोगिता सासणे उपस्थित होते.
गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी यांना मिळालेली बक्षिसे.


प्रथम क्रमांकप्राप्त ९ इव्हेट

भारतीय समूह गीत गायन -प्रथम क्रमांक
मराठी एकांकिका – प्रथम क्रमांक
हिंदी एकांकिका – प्रथम क्रमांक
मराठी स्किट – प्रथम क्रमांक
हिंदी स्किट – प्रथम क्रमांक
शास्त्रीय नृत्य – प्रथम क्रमांक – श्रेया पाटकर
लोकनृत्य – प्रथम क्रमांक
मराठी वादविवाद -प्रथम क्रमांक – वर्षा काळे, अवंती काळे
पोस्टर मेकिंग – प्रथम क्रमांक – आर्या थुळ

द्वितीय क्रमांक मिळवलेले ७ इव्हेंट

मेहंदी – द्वितीय क्रमांक – अझमिन साखरकर
हिंदी कथाकथन – द्वितीय क्रमांक – आठवले ओंकार
मराठी वक्तृत्व – द्वितीय क्रमांक – मनस्वी नाटेकर
सुगम गीत गायन -द्वितीय क्रमांक -तन्वी मोरे
नाट्य गीत गायन – द्वितीय क्रमांक – सानिका गोखले
शास्त्रीय गीत गायन – द्वितीय क्रमांक – चैतन्य परब
हिंदी वादविवाद – द्वितीय क्रमांक – जान्हवी जोशी, कल्पजा जोगळेकर

तृतीय क्रमांकाचे 2 इव्हेंट

मराठी कथाकथन – तृतीय क्रमांक – मीरा काळे
मराठी एकपात्री – तृतीय क्रमांक – कौशल मोहिते

कोलाज – उत्तेजनार्थ – सुरक्षा महाकाळ

महाविद्यालयाने एकूण 19 कलाप्रकारामध्ये 66 पॉईंट्स प्राप्त केले आहे.

स्पर्धेसाठी मार्गदर्शक म्हणून एकांकिका ओंकार पाटील समूह गायन ओंकार बंडबे , स्किट यतीन पवार, मुकाभिनय जतिन आग्रे, लोकनृत्य हेमंत कांचन, काम पाहिले
विद्यार्थी व्यवस्थापन स्वराज साळुंखे याने केले.
यशस्वी संघाचे अभिनंदन प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी यांनी केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE