रत्नागिरी : रत्नागिरी येथे रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीने १० ऑगस्ट रोजी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या शिबिराला क्लब मेंबर्स तसेच त्यांच्या मित्र परिवाराकडून उदंड प्रतिसाद लाभला. एकूण ६० जणांनी या शिबिराला भेट दिली. त्यातील ४२ जणांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमाची जबाबदारी रोटे विश्वजित कोतवडेकर यांच्याकडे दिली होती आणि त्यांनी ती उत्तम रितीने पार पाडली. कार्यक्रमासाठी अध्यक्ष श्रीकांत भुर्के, प्रमोद कुलकर्णी, नीलेश मुळे, धरमसी चौहान, अंजली इंदुलकर, राजेंद्र घाग, वेदा मुकादम, देवदत्त मुकादम , सचिन शिंदे, नीता शिंदे, डॉ. अविनाश भागवत, डॉ.मनीषा भागवत, अशोक घाटे, मंदार आचरेकर, सुरेंद्र यारम, रोहित वीरकर, स्वप्नील साळवी, मंदार सावंत -देसाई, केतन सावंत, परेश साळवी, आनंद चौगुले हे रोटरीमधील विविध पदाधिकारी उपस्थित होते. तसेच लोकमतचे रत्नागिरी आवृत्ती प्रमुख मनोज मुळे यांनी देखील रक्तदान केले.
रोटरी क्लब ऑफ मिडटाउनचे अध्यक्ष बिपीनचंद्र गांधी यांनी देखील या शिबिराला शुभेच्छा भेट दिली. सिव्हिल हॉस्पिटल मधील जयश्री मॅथु सिस्टर, संगीता डोंगरकर सिस्टर , विद्या खेरुकर, सुनीता जाधव, संदीप पवार या सर्व स्टाफ मेंबर्सनि खूप छान सहाय्य करत हे शिबीर उत्साहात पार पाडले. अध्यक्ष आणि सचिवांनी मदत करणाऱ्या सर्व रोटरी सदस्य, रक्तदाते आणि सिव्हिल रुग्णालयामधील सर्व स्टाफ आणि प्रशासनाचे आभार मानले.
