रत्नागिरी : उक्षी गावचे सुपुत्र, माजी सरपंच,विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष मिलिंद खानविलकर यांची नुकतीच विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.
ही निवड महाराष्ट्राचे उद्योगमंत्री,रत्नागिरी – रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी निवड केली आहे.
मिलिंद खानविलकर यांचा दांडगा जनसंपर्क आहे.उक्षी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांनी ५ वर्षे पद भूषवले आहे.आता उक्षी ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त अध्यक्षपदी आहेत. आपल्या सरपंच कार्यकाळात त्यांनी अहोरात्र झटून गावच्या विकासाला हातभार लावला आहे.त्यांच्याच कारकर्दीत उक्षी ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार ही प्राप्त झाला आहे.
जात पात न मानता जनमाणसात मिसळून रात्री अप रात्री अडल्या नडल्या लोकांना मदत केली आहे.
कोरोना काळात उल्लेखनीय कार्य मिलिंद खानविलकर यांनी केले आहे.जेव्हा जेव्हा वेळ आली तेव्हा श्री.खानविलकर यांनी स्वत:ची पदरमोड करून लोकांना आर्थिक सहकार्य केले आहे.
आज पंचक्रोशीत मिलिंद खानविलकर यांचे नाव सामाजिक कार्यात अग्रेसर आहे.शासकीय कार्यालयांमध्ये,रुग्णालयात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी लोकांना अडचणी आल्या तर मिलिंद खानविलकर हे स्वतः जातीनिशी लक्ष घालून लोकांच्या पाठी ठामपणे उभे असतात.
त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन मिलिंद खानविलकर यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या निवडबद्दल अगदी योग्य माणसाची निवड करण्यात आली आहे असे अनेकांनी सांगितले आहे.आता लोकांची कामे अधिक जलदगतीने होतील असा विश्वास लोकांनी व्यक्त केला आहे.
या निवडीबद्दल अनेकांनी मिलिंद खानविलकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
