स्पर्धेत ८७ विद्यार्थ्यांचा सहभाग
संगमेश्वर दि. ११ ( प्रतिनिधी ): शासनातर्फे आयोजित केली जाणारी बालचित्रकला स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांना आपल्यातील कलागुण दाखविण्याची एक उत्तम संधी असते. रत्नागिरी जिल्हा परिषदेने शोध कलारत्नांचा हा उपक्रम जिल्हाभर सुरु केला असल्याने या उपक्रमाचा वर्षभरातील विविध चित्रकला स्पर्धांना मोठा लाभ होणार आहे. आज संपन्न झालेल्या बाल चित्रकला स्पर्धेत पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या ८७ विद्यार्थ्यांनी उत्सफुर्तपणे भाग घेतला.

तिसऱ्या गटामध्ये एकूण ५२ आणि चौथ्या गटामध्ये ३५ विद्यार्थ्यांनी भाग घेऊन सकाळी ११ ते १ या वेळात सुंदर अशा कलाकृती रेखाटल्या . व्यापारी पैसा फंड संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर यांनी स्पर्धास्थानी भेट देवून विद्यार्थ्यांच्या कलाकृती पाहून त्यांचे कौतूक केले. विद्यार्थ्यांच्या उत्सफुर्त सहभागाबद्दल प्रशालेच्या कलाविभागाचेही संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
