Mumbai-Goa Highway | मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प

निवळी घाटात टँकर उलटला


रत्नागिरी  : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर निवळी घाटात गॅस वाहू टँकर उलटून महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली आहे. शनिवारी दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी हा अपघात झाला.

निवळी घाटात रस्त्याच्या मधोमध उलटलेला टँकर
अपघातानंतर महामार्गावर लागलेली वाहनांची रांग

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर निवळी घाट उतरत असलेला गॅस वाहू टँकर महामार्गावर मधोमध आडवा झाल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडली आहे. पर्यायी मार्ग असल्याने महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अपघातग्रस्त टँकरमधून गॅस गळती होण्याचा धोका असल्यामुळे रांगा लागलेल्या वाहनांमधील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र हा टँकर रिकामा असल्याचे नंतर सांगण्यात आले. मात्र घटनास्थळी अपघातानंतर अपघातग्रस्त टँकरच्या इंधन टाकीतील इंधन गळती होऊ लागल्याचे निदर्शनास आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह संबंधित सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. या अपघातानंतर घाटात दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE