https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांचा रत्नागिरीत २६ रोजी जाहीर सत्कार व व्याख्यान

0 84


रत्नागिरी, २४ ऑगस्ट : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदु संघटन आणि हिंदु राष्ट्र निर्मितीचे स्वप्न साकार करण्यासाठी देशभरात प्रवास करून हिंदूंमध्ये जागृती आणि संघटन करणारे हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांना अलिकडेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा. योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते दिल्ली नोएडा येथे सांस्कृतिक योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या राष्ट्र-धर्म विषयक कार्याची दखल घेऊन सकल हिंदू समाज रत्नागिरीतर्फे त्यांचा 26 ऑगस्ट 2023 रोजी जयेश मंगल पार्क, माळनाका, रत्नागिरी येथे सायंकाळी 6 वा. जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी त्यांचे ‘हिंदु धर्मावरील सर्व आघातांवर उपाय हिंदु राष्ट्र’ या विषयावर व्याख्यानही होणार आहे.


श्री. रमेश शिंदे यांनी स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण घेतले असून भारतीय वायुदलाच्या गृहनिर्माण विभागात काही वर्षे सेवा केली आहे. ते सनातन धर्मभूषण, हिंदू कुलभूषण आदी पुरस्काराने सन्मानित असून त्यांना अलीकडेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि लोकसभेच्या माजी सभापती श्रीमती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते “सांस्कृतिक योद्धा”या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते पूर्णवेळ धर्मप्रसारक म्हणून देशभर प्रवास करतात. धर्म आणि राष्ट्र यांच्या संदर्भात विविध क्षेत्रातील विषयावरील अभ्यासू व्याख्याते आणि वृत्तपत्रातील स्तंभलेखक म्हणूनही ते ओळखले जातात.अनेक राष्ट्रीय दुरचित्रवाहिन्यांवरील चर्चासत्रात त्यांनी हिंदू धर्माची बाजू प्रभावीपणे मांडली आहे.त्यांनी ‘लव्ह जिहाद’ आणि ‘हलाल जिहाद’ या समस्यांच्या संदर्भातील पहिला अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला आहे.याशिवाय सनातनच्या काही ग्रंथांचे ते संकलकही आहेत.

हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे


तरी रत्नागिरी येथे 26 ऑगस्ट रोजी होणाऱ्या त्यांच्या या सत्कार सोहळ्यास आणि व्याख्यानासाठी हिंदूंनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल हिंदु समाज रत्नागिरीच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा : Vande Bharat Express | गणेशोत्सवात मडगाव वंदे भारत एक्सप्रेस धावणार हाऊसफुल!

Leave A Reply

Your email address will not be published.