उरण ( विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातून उत्तमोत्तम व गुणवंत खेळाडू तयार व्हावेत आणि हे खेळाडू राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर चमकावेत या दृष्टीकोनातून तसेच खेळाडूंना उत्तम व्यासपीठ मिळवून देण्याच्या अनुषंगाने सत्यम इंटरनॅशनल या संस्थेतर्फे रविवार दि. 27 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळत उरण शहरातील स्वा. सावरकर मैदान येथे तालुका स्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

जास्तीत जास्त रसिक प्रेषकांनी, नागरिकांनी या स्पर्धेचा आस्वाद घेऊन खेळांडूचा आनंद द्विगुणीत करावा, असे आवाहन सत्यम इंटरनॅशनल या संस्थेतर्फे करण्यात आले आहे.














