देवरुखकर बंधूचा आदर्श : जोपासली गणेश सेवा
संगमेश्वर : घरातच मूर्ती बनवण्याचा कारखाना, निरीक्षण करून वडिलांना मदत म्हणून आणि स्वतःची आवड असल्याने वडीलांच्या पश्चात स्वतः मूर्तीकार झाले, बाप्पा त्यांच्या हातून घडत गेले आणि तिच सेवा आता अनेक वर्ष चालू आहे.
वडिलांच्या निधनानंतर ओंकार व अमोल देवरुखकर हे दोन भाऊ मूर्तीकलेचा वारसा जपत आहेत. संगमेश्वर तालुक्यातील धामणी सोनारवाडी येथील देवरुख बंधूची मूर्तीशाळा अनेक वर्ष चालू आहे. आजोबा पंजोबा हयात असताना हा कारखाना सुरू आहे.
ओंकार आणि अमोल देवरुखकर हे दोन सख्खे भाऊ यांच्या घरात परंपरागत चालत आलेली मूर्तीशाळा आजही त्याच डौलाने सुरू आहे याचं कौतुक आहे.
आपल्या सहकाऱ्यांना सोबतीला घेऊन हे दोन बंधू गेली वीस वर्षे छंद म्हणून हि कला जोपासण्याचे कामं करत आहेत
शिक्षण घेत असताना एक आवड म्हणून आणि वडीलांना मदत म्हणून हे दोघे भाऊ संध्याकाळच्या वेळी कारखान्यात काम करत होते.
अनेक वर्ष वडिलांना मूर्ती करताना बघून कालांतराने ते स्वतः मूर्तीकार झाले आणि त्यांच्या हातून नकळत सुंदर बाप्पा आकार घेऊ लागले. शिवाय रंगकामातील बारकावे त्यांनी समजून घेतले आणि त्यातही ते अव्वल झाले
आता प्रत्येकाच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत प्रत्येक ग्राहकाला पाहिजे ती मूर्ती आणि पाहिजे तसा रंगकामाला भर दिला जात आहे त्यामुळे अल्पावधीतच अमोल आणि ओंकार लोकप्रिय झाले. त्यांच्या मूर्तीशाळेतून संगमेश्वर तसेच चिपळूण तालुक्यात बाप्पा जातात.
यंदाच्या हंगामात त्यांच्याकडे अडीचशे गणपती आहेत
आम्ही त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले जगाला आकार देणारा बाप्पा जेव्हा आमच्या हातून साकारला जातोय हेच आमच्यासाठी खूप आहे
प्रत्येक ग्राहकाला पाहिजे ती मूर्ती आणि पाहिजे तो रंग भरताना खूप छान वाटतं. आम्हाला आमच्या कुटुंबातील सदस्यांची मदत असते तसेच मित्रपरिवार यांचाही हातभार मोठा आहे.
आता काहीच दिवस शिल्लक असताना आता आम्ही सहकाऱ्यांच्या मदतीने दिवस रात्र कामं करून वेळेआधीच वचनपूर्ती करण्यासाठी प्रयत्नशील असतों आणि त्यात आम्हाला यश मिळते तेंही बाप्पाच्या आशीर्वादाने असं उद्गार मूर्तीकार देवरुखकर बंधूंनी काढलले.
