रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ सोहळा

शिक्षक दिनानिमित्त उपक्रम

रत्नागिरी : शिक्षक दिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीने , रोटरी इंडिया लीट्रसी मिशन अंतर्गत “नेशन बिल्डर अवॉर्ड” हा कार्यक्रम दि. ५ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजता स. रा. देसाई अध्यापक विद्यालय येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून स. रा. देसाई अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य नेताजी कुंभार आणि रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष रोटे श्रीकांत भुर्के उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटे देवयानी वाघधरे यांनी केले त्यात त्यांनी रोटरी इंडिया लीट्रसी मिशन विषयी सर्व उपस्थित मान्यवरांना माहिती दिली तसेच
T-Teacher Support
E-E-Learning
A-Adult Literacy
C-Child Development
H-Happy School
या अंतर्गत रोटरीने केलेल्या विविध कामांची माहिती दिली.

विशेष सन्मान म्हणून स. रा. देसाई अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य नेताजी कुंभार यांचा त्यांचेच विद्यार्थी आणि जेष्ठ रोटरी सदस्य हातखंबकर सर यांच्या हस्ते शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला . शिक्षण क्षेत्रात त्यांची प्रदीर्घ अशी ३३ वर्षे सेवा झाली आहे त्यात त्यांना जिल्हा , राज्य अशा विविध पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत, तसेच त्यांच्याच घरातील १० मंडळी विविध ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहेत

त्यानंतर विविध शाळेतील ९ शिक्षकांचा सन्मान रोटरी अध्यक्ष श्रीकांत भुर्के , ज्येष्ठ सदस्य नमिता कीर , धरमसी चौहान , विनायक हातखंबकर , ज्येष्ठ शिक्षक इनामदार सर , प्राचार्य नेताजी कुंभार यांच्या हस्ते करण्यात आला.

१) प्रकाश कामेरकर – जिल्हा परिषद शाळा जांभरूल सडये
२) वहिदा बुद्धु – जिल्हा परिषद शाळा शिरगाव उर्दू
३) समृद्धी गोणबोरे – जिल्हा परिषद शाळा निवेंडी वरची
४) वृषाली हेळेकर – जिल्हा परिषद शाळा शिरंबाड
५) वैशाली झोरे – जिल्हा परिषद शाळा चिंद्रवली
६) संजना तारी – गोदूताई जांभेकर विद्यालय रत्नागिरी
७) आनंद खांडेकर – पोतकर गुरुजी विद्यामंदिर डोर्ले
८) इम्तियाज सिद्दीकी – मेस्त्री हायस्कूल रत्नागिरी
९) योगेश कदम – दामले विद्यालय रत्नागिरी

यांचा सत्कारमूर्तींमध्ये समावेश होता.

या कार्यक्रमाचे विशेष महत्व म्हणजे पुरस्कार मिळालेले काही शिक्षक हे स रा देसाई विद्यालयाचे विद्यार्थी होते आणि पुरस्कार देणारे अध्यक्ष हे त्यांचे शिक्षक होते. दोन्ही प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात शिक्षकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच D.L.ED मधील नवीन शिक्षक म्हणून अभ्यास करत असलेल्या विद्यार्थाना मार्गदर्शन केले .

इम्तियाज सिद्दीकी यांनी मनोगत व्यक्त करताना रोटरीने दिलेल्या सन्मानाबद्दल आभार मानले आणि सर्व शिक्षकांची जबाबदारी या सन्मानामुळे अजून वाढली नमूद केले तसेच रोटरीच्या कार्यांत सहभागी होण्याचे मानस व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटे मुग्धा कुळये यांनी केले , सचिव प्रमोद कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले.

कार्यक्रमाला रोटरी मधून सचिन सारोळकर – क्लब लीट्रसी हेड , धरमसी चौहान , नमिता कीर ,विनायक हातखंबकर , योगेश पंडित , ऋता पंडित , सचिन शिंदे , नीता शिंदे , राजेंद्र घाग , रुपेश पेडणेकर , मुकेश गुप्ता , निलेश मुळे , परेश साळवी , धीरज वेल्हाळ , मंदार आचरेकर , माधुरी कळंबटे , मंदार सावंतदेसाई , प्रसाद मोदी , प्रकल्प आराध्ये उपस्थित होते .
तसेच स रा देसाई मधील शिक्षक श्री. पाटील , श्री. रावराणे, आवटी मॅडम , D.L.ED चे विद्यार्थी उपस्थित होते . केंद्र प्रमुख अमर घाडगे सर , जेष्ठ शिक्षक इनामदार यांनी देखील या कार्यक्रमात उपस्थिती नोंदवली

हा कार्यक्रम यशस्वी करण्यात रोटरी अध्यक्ष श्रीकांत भुर्के , सचिव प्रमोद कुलकर्णी, लीट्रसी हेड सचिन सारोळकर ,विनायक हातखंबकर, मुग्धा कुळये, देवयानी वाघधरे, माधुरी कळंबटे यांनी मेहनत घेतली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE