रत्नागिरी, दि. ५ (जिमाका) :- अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे स्वागत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.

मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे हे जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. येथील शासकीय विश्रामगृहात त्यांचे पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकारी श्री. सिंह, पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, परिविक्षाधीन आयएएस डॉ. जस्मिन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी स्वागत केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी राजश्री मोरे, वैशाली माने, आकाश लिगाडे, विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
- हे देखील वाचा : Konkan Railway | दिवा- रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेनला आणखी दोन थांबे
- Konkan Railway | गणेशोत्सवात चिपळूणसाठी स्वतंत्र मेमू स्पेशल गाडी धावणार!
- Konkan Railway | गणेशोत्सवासाठी दिवा-रत्नागिरी मार्गावर यंदा प्रथमच मेमू स्पेशल धावणार!
