https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

यंदाच्या गणेशोत्सवातील चिपळूणची पहिली मेमू उद्या संध्याकाळी सुटणार

0 94

पूर्णपणे अनारक्षित गाडीमुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा

चिपळूण : येत्या गणेशोत्सवात चिपळूणपर्यंत येणाऱ्या गणेश भक्तांसाठी चालवण्यात येणारी मेमू स्पेशल ट्रेन चिपळूणपर्यंत येणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार आहे. दिवा ते चिपळूण मार्गावर दिनांक १३ सप्टेंबरपासून ३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत मेमू स्पेशल गाडी चालवण्यात येणार आहे. पूर्णपणे अनारक्षित असलेल्या या गाडीमुळे मुंबईहून गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दि. १३ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दिवा-चिपळूण मेमू स्पेशल गाडीच्या एकूण 36 फेऱ्या होणार आहेत.

दिवा ते चिपळूण मेमू स्पेशल 01155/01156 गाडी दिवा येथून सायंकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी सुटून चिपळूणला ती रात्री १ वाजून २५ मिनिटांनी पोहोचणार आहे.
चिपळूणला आलेली मेमू स्पेशल गाडी दुसऱ्या दिवशी दिनांक 14 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दुपारी १ वा. १० मिनिटांनी सुटून रात्री ७ वाजता ती दिवा जंक्शनला पोहोचेल.

दिवा चिपळूण मेमू स्पेशल गाडीचे थांबे


पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड तसेच अंजनी.

दिवा ते चिपळूण ही १२ डब्यांची गाडी असेल. पूर्णपणे अनारक्षित असलेल्या या गाडीमुळे नियमित तसेच विशेष गाड्यांचे कन्फर्म आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी कोकण रेल्वे तसेच मध्य रेल्वेने रत्नागिरी पर्यंत धावणारी मेमू स्पेशल गाडी देखील जाहीर केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.