“आयुष्मान भव” मोहीमेचा लाभ घ्या : डीएचओ डॉ. आठल्ये


रत्नागिरी, दि.22 : जिल्ह्यातील सर्व वयोगटातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी “आयुष्मान भव” मोहीम हाती घेण्यात आली आहे. सर्व लाभार्थानी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.


जन सामान्यांना एकाच छताखाली आरोग्य सेवा देण्यासाठी देशभरात 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत ‘आयुष्मान भव’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत ‘अबाल वृद्धा’च्या 32 प्रकारच्या आरोग्य तपासण्या व मोफत उपचार केले जात आहे. आयुष्यमान भारत, आभा कार्डसह विविध आरोग्य सेवा देण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी
सांगितले. ‘आयुष्मान भव’ मोहिमेतून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून अगदी घरापर्यंत जाऊन लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाची आरोग्याची तपासणी मोफत करण्यात येत असल्याने ग्रामस्थांच्या ‘आरोग्याची नांदी’ असल्याचे चित्र आहे.

या सोबत आरोग्य संस्थाची स्वच्छता, रक्तदान शिबीरे व अवयवदान बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. आयुष्मान आपल्या दारी 3.0 उपक्रमांतर्गत पात्र लाभार्थ्याची नोंदणी करुन आयुष्मान कार्ड वाटप करण्यात येत आहे. तसेच आयुष्मान सभा घेऊन गावपातळीवर प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत असंसर्गजन्य रोग, सिकलसेल, लसीकरण व क्षयरोग आदीबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

गावपातळीवर तपासणी
प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रा अंतर्गत गावातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात
येणार आहे. यासाठी 4 आठवड्याचा कार्यक्रम आखण्यात आला असून प्राथमिक आरोग्य केंद्राकडून
आठवड्याच्या दर शनिवारी 32 प्रकारच्या आजारांची तपासणी मोफत केली जात आहे.

आयुष्मान भव’तील तपासण्या
लहानमुलांसाठी : ‘आयुष्मान भव’ मोहिमे अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून अंगणवाडी व
प्राथमिक शाळामधील 0 ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी, जन्मजात
विकृती, शारीरिक व मानसिक विकास, कुपोषण याबाबत सेवा देण्यात येत आहेत.
वृद्धांसाठी : सर्व समावेशक आरोग्य सेवा, मानसिक आरोग्य, वाढत्या वयातील आजार व परिहारक
उपचार, मौखिक आरोग्य, नेत्र, कान, नाक व घसा तपासणी, समुपदेशन सेवा, योगा व वेलनस उपक्रम,
मोफत औषधी, प्रयोगशाळा तपासणी तसेच टेलीकन्सलटेशन सेवा देण्यात येत आहेत.

आरोग्य तपासणी कार्यक्रमाची रूपरेषा
आठवडा 1 : मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग, तोंड, गर्भाक्षय, ग्रीवा आणि स्तन कर्करोग तपासणी

आठवडा 2: क्षयरोग, कुष्ठरोग आणि इतर संसर्गजन्य रोग

आठवडा 3: माता आणि बाल आरोग्य, पोषण आणि लसीकरण
आठवडा 4: नेत्ररोग तपासणी आणि नेत्र निगा सेवा

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE