कोमसापचे गणेशोत्सवानिमित्त कविसंमेलन

उरण दि 22(विठ्ठल ममताबादे ) उरण तालुका कोकण मराठी साहित्य परिषद(कोमसाप )च्या वतीने उरण तालुक्यातील वशेणी या गावी भक्तीमय गीतांनी भारलेले बहारदार कविसंमेलन रायगडभूषण प्रा एल बी पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले.


कोमसाप उरणचे अध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे उपस्थितांचे स्वागत केले.कार्यक्रमाची सुरुवात करतांना म्हात्रे यांनी”खड्ड्याच्या रस्त्यातून गणरायाचे आगमन “ही सामाजिक विषयाची कविता सादर केली.कवी पंडित रमण अभंग आणि पाच बोलीतील ढंगदार रचना गायिली.ढोलकी वादक
गौरीश पाटील सर्व गीतांना सुरेख साथ दिली.कवी भरत पाटील यांनी आगरी बोलीत विनोदी ढंगात कविता सादर करून रंगत आणली.

इंडिया झिंदाबादचे अध्यक्ष रमेश थवई यांनी अभंग गवळण आणि वीरगीतांचे गायन केले.जे.डी.म्हात्रे इत्यादी 11 कवींनी कवितांचा बहारदार कार्यक्रम श्रोत्यांना दिला. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते निलेश म्हात्रे,महेंद्र पाटील, बळिराम म्हात्रे,घन:शाम पाटील, चंद्रकांत पाटील,राहुल थवई, नारायण पाटील,सतीश पाटील इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन‌ म.का.म्हात्रे यांनी सुरेख केले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE