रत्नागिरी : हवामान खात्याच्या अंदाजानुसार शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी परिसरात रात्री पूर्व मोसमी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सकाळी देखील रत्नागिरीच्या काही भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.
दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कोसळलेल्या हलक्या सरीमुळे काहीसा दिलासा मिळाला. भारतीय हवामान खात्याच्या कुलाबा वेधशाळेने कोकण किनारपट्टीवर पूर्व मोसमी पावसाचा इशारा दिला आहे.
सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी शहर परिसरात हंगामपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या.

