कोकण विभागीय तायक्वांदो स्पर्धेत शीतल आचरेकर हिला रौप्य पदक


रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ,कोकण विभाग नं. 4 व कणकवली कॉलेज कणकवली आयोजित आंतर महाविद्यालयीन कोकण विभाग तायक्वॉंदो स्पर्धा दि. ५ व ६ ऑक्टोबर रोजी घेण्यात आली. या स्पर्धेत लांजा तालुक्यातील सीनियर कॉलेज लांजाची विद्यार्थिनी शीतल विरेंद्र आचरेकर हिने उत्तम कामगिरी करत रौप्य पदक मिळविले.

शीतल आचरेकर ही तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी लांजा मध्ये महिला प्रशिक्षक,नॅशनल रेफ्री, ब्लॅक बेल्ट व क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे स्वयंसिध्दा प्रशिक्षक आहे. तसेच तिला लांजा सीनियर महाविद्यालयाचे क्रिडा शिक्षक शशांक उपशेट्टे सर व लांजा तायक्वॉंदो प्रमुख प्रशिक्षक तेजस दत्ताराम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.


तसेच तिची 11व 12 ऑक्टोबर मुंबई तेथे होणाऱ्या मुंबई विद्यापीठ तायक्वॉंदो स्पर्धे करीता निवड झाली आहे.तिच्या या यशा बद्दल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांजाचे प्राचार्य सर्व प्राध्यापक,तिच्या मंदरुळ गावातील सर्व गावकरी,तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी लांजाचे सर्व पदाधिकारी व लांजा- राजापूर वासियांनी तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE