खो-खो स्पर्धेत जगन्नाथ पेडणेकर विद्यालयाचे दोन्ही संघ विजयी

लांजा : १४ वर्षे वयोगट शालेय खो-खो स्पर्धेत जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे या प्रशालेचे मुलगे- मुली दोन्ही संघ तालुका विजयी झाले आहेत. गेली अनेक वर्षांची विजयी घौडदौड मुलींच्या संघाने कायम राखली.

संघाची कर्णधार राज्स्तरीय खेळाडू कु. कस्तुरी मेस्त्री हिच्या नेतृत्वाखाली सुंदर खेळाचे प्रदर्शन केले. तन्वी इंगळे,जान्हवी गुरव, सृष्टी शिंदे,उज्वला दरडे यांनी सुंदर खेळ केला त्यांना लतिका सावंत,शर्वरी तिखे, गायत्री दरडे,गार्गी राऊळ, साक्षी दरडे यांनी साथ दिली.


मुलांच्या अंतिम सामन्यात लांजा हायस्कूलची विजयी परंपरा मोडीत काढून मुलांनी अंतिम सामना १ डाव राखून जिंकला.तळवडे संघाकडून प्रसाद पाष्टे, दिपराज इंगळे, समर्थ साळवी, श्रेयस तिखे,चेतन इंगळे, तनिश तिखे यांनी अप्रतिम खेळ केला. त्यांना स्वयंम कुंभार, सौरभ कामेरकर, तनिश पितळे,विक्रम चव्हाण, रोहित इंगळे, शुभम इंगळे यांनी साथ दिली.


सर्व खेळाडू, मार्गदर्शक यांचे संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. आनंद जगन्नाथ पेडणेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री डी बी पाटील यांनी अभिनंदन केले आहे

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE