एकाच दिवसात रेल्वेने वसूल केला तब्ब्ल ८ लाख ६६ हजारांचा दंड!

मुंबई : मुंबई विभागत ठाणे रेल्वे स्थानकावर दि. ९.१०.२०२३ रोजी सखोल तिकीट तपासणी दरम्यान एकाच दिवसात विनातिकीट /अनधिकृत प्रवासाची एकूण ३०९२ प्रकरणे आढळून आली, यावेळी केलेल्या कारवाईत रु. तब्बल ८,६६,४०५/- दंड वसूल करण्यात आला.

मध्य रेल्वे, मुंबई विभाग दि. ९.१०.२०२३ रोजी ठाणे रेल्वे स्थानकावर १२० तिकीट तपासणी कर्मचारी आणि तीन अधिकारी श्री अरुण कुमार वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, श्री दीपक शर्मा विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि श्री डग्लस मिनेझेस सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक आणि ३० आरपीएफ कर्मचारी टीमने तिकीट तपासणी मोहीम राबवली. या तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान, विनातिकीट/अनधिकृत प्रवासाच्या ३०९२ प्रकरणांत दंड आकारण्यात आला आणि एका दिवसात रू. ८,६६,४०५/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

रेल्वे वापरकर्त्यांसाठी आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा सुनिश्चित करण्यासाठी, मुंबई विभाग विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी उपनगरीय, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा, विशेष ट्रेनमध्ये तिकीट तपासणीचे आयोजन करते.

आमच्या तिकीट तपासणी कर्मचार्‍यांच्या प्रामाणिक, समर्पित आणि वचनबद्ध कार्यामुळे आणि लहान मुले/अल्पवयीनांना वाचवण्याच्या अनेक प्रकरणांमुळे तसेच जीवन वाचवण्याच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. ज्यामुळे रेल्वेची अतिशय सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यात मदत झाली आहे.

प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करावा आणि सन्मानपूर्वक प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वे करीत आहे

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE