पत्रकार सुरेश सप्रे यांना मातृशोक

देवरुख दि. २२ ( प्रतिनिधी ): देवरुख येथील ज्येष्ठ पत्रकार सुरेश वामन सप्रे यांच्या मातोश्री श्रीमती सुमती सप्रे (वय ९१ वर्ष) यांचे आज पहाटे ६-४५ वा च्या सुमारास दु:खद निधन झाले.

गेले काही दिवस त्या आजारी होत्या. अनेकवेळा अत्यंत गंभीर स्थितीतुन त्यानी प्रबळ इच्छा शक्तीच्या बळावर साक्षात मृत्युला परत धाडले. आज पहाटे मात्र त्यानी हार मानली आणि त्यानी अखेरचा श्वास पावणे सातच्या सुमारास घेतला. मूळ गाव कोंढ्रण असणा-या सुमती सप्रे या सर्वत्र ‘ताई’ या नावाने सुपरिचित होत्या. अत्यंत प्रेमळ; सुस्वभावी असणा-या ताई या कोंड्रण गावात आणि देवरुखात लोकप्रिय होत्या. त्यांच्या रुपाने जुन्या नव्या पिढीला एकत्र जोडणारा एक दुवा निखळला आहे.


त्यांच्या पश्चात ५ मुलगे सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE