अर्धंम् वेब सिरीजचा आमदार शेखर निकम यांच्या हस्ते शुभारंभ

रत्नागिरी : स्वामी हो, श्रीपाद राजम् शरणं प्रपध्ये, तेजीनिधी, या मराठी वेब सिरीजच्या यशानंतर श्री. असित रेडिज हे एका नवीन हिंदी वेब सीरिजला सुरुवात करत आहेत. ‘अर्धंम्’ या हिंदी वेब सीरिजच चित्रीकरण शुभारंभ चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सावर्डे येथे संपन्न झाला.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांस्कृतिक चित्रपट व कला विभागाचे प्रदेश चिटणीस, निर्माता दिग्दर्शक असित रेडिज, ज्येष्ठ कलाकार डॉ. भगवान नारकर, उद्योजक प्रशांत निकम, पूर्वा निकम, निर्माता, दिग्दर्शक असित रेडिज, कथा – डॉ. अभिजित सावंत, पटकथा -असित रेडीज व डॉ.अभिजीत सावंत. कार्यकारी निर्माता- मंगेश डोंगरे,
निर्मिती व्यवस्थापन – देवराज गरगटे, सुरज बिजितकर,
कॅमेरा – अमोल नेटके व सहकारी उपस्थित होते.

वेब सिरीजमधील कलाकार – अमोल रेडिज, दीपा आमरे, प्रज्ञा पेंडसे, केतकी कारेकर, नंदकिशोर जुवेकर, सुप्रिती शिवलकर, अभिजीत काटदरे, देवराज गरगटे, रजत बेलवलकर, सुरज बिजितकर आदी.

या वेब सिरीजचे चित्रीकरण सावर्डे आरवली व माखजन या परिसरात होत आहे. मुंबई पुण्यासह येथील स्थानिक कलाकारांना देखील या हिंदी वेब सिरीजमध्ये काम करण्याची संधी देण्यात येत आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE