रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा भारतीय जनता पक्षाचे नेते नीलेश राणे हे दि. 2 नोव्हेंबरपासून तीन तालुक्यांचा दौरा करणार आहेत. राजकीय संन्यासाची भूमिका त्यांनी मागे घेतल्यानंतर श्री. रणे यांचा हा पहिलाच दौरा आहे.
या दौऱ्यामध्ये नीलेश राणे यांचे ठिकठिकाणी स्वागत केले जाणार आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने संघटनेला बळ देण्याचे काम माजी खासदार नीलेश राणे हे करणार आहेत. राजापूर लांजा तसेच रत्नागिरी तालुक्यातील त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.

