रत्नागिरीत आरोग्य सहाय्यकाला १५ हजार रुपयांची लाच घेताना पकडले


रत्नागिरी, दि. ३१ : बांधकामाकरिता आवश्यक असणारा आरोग्य विभागाकडील ना हरकत दाखला देण्यासाठी कोतवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोपी लोकसेवक शैलेश आत्माराम रेवाळे (वय ३८ वर्षे) याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 15 हजाराची लाच स्वीकारताना आज रंगेहात पकडले.


तक्रारदार यांच्या मालकांचे बांधकामाकरिता आवश्यक असणारा आरोग्य विभागाकडील ना हरकत दाखला मिळण्याकरिता तयार केलेला अर्ज स्वीकारण्यासाठी व त्याबाबतचे कामकाज पूर्ण करून ना हरकत दाखला देण्यासाठी यातील आरोपी लोकसेवक यांनी 26 ऑक्टोबर रोजी 15 हजार रुपये लाच रक्कमेची मागणी केली. मागणी केलेली लाच 15 हजार रुपये आज रोजी आरोपी लोकसेवक यांनी पंचा समक्ष स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. आरोपी लोकसेवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.


एसीबी ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे, अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर, अपर पोलीस अधीक्षक सुधाकर सुराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक शहानवाज मुल्ला, पोहवा. संतोष कोळेकर, पोहवा.विशाल नलावडे, पो. ना. दीपक आंबेकर, पो.कॉ. हेमंत पवार यांनी ही कारवाई केली.


कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने एखाद्या खासगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा परवानगी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी कार्यालय फोन नं. 02352- 222893, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उपअधीक्षक सुशांत चव्हाण मो.नं.9823233044, पोलीस निरीक्षक शहानवाज मुल्ला मो. नं. 7774097874, पोलीस निरीक्षक अनंत कांबळे मो.न. 7507417072 , टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल,असे आवाहन उपअधीक्षक श्री. चव्हाण यांनी केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE