वनवासी कल्याण आश्रमातर्फे आदिवासी वाडीवर मिठाई वाटप

उरण दि. १५ (विठ्ठल ममताबादे ) : वनवासी कल्याण आश्रम चे वतीने निसर्ग संपन्न अश्या उरण तालुक्यातील रानसई ग्रामपंचायत हद्दीतील खैरकाठीवाडी, भुऱ्याची वाडी,बंगल्याची वाडी ,आणि मार्गाची वाडी या चार वाड्यांवर हिंदू सण दीपावली, लक्ष्मीपूजन निमित्त दिवाळी मिठाई वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

बंगल्याचीवाडी,मार्गाची वाडीवर रानसई ग्रामपंचायत सरपंच पारधी मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या प्रसंगी वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष मनोज ठाकूर यांनी हिंदू धर्मात असलेल्या दिवाळी सणाचे महत्व सांगितले, वनवासी कल्याण आश्रम आपल्या वाड्यांवरील विद्यार्थ्यां चे शिक्षणासाठी नेहमीच पुढाकार घेत असून ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणात आर्थिक अडचण येत असेल त्यांचा आर्थिक भार वनवासी कल्याण आश्रम उचलेल असे सांगितले.

जिल्हा हितरक्षा प्रमुख मीराताई पाटील यांनी 25 नोव्हेंबर रोजी निघणाऱ्या कल्याण आश्रम चे जनजाती सुरक्षा मंचाच्या डी लिस्टिंग मोर्चाची माहिती उपस्थितांना दिली.खैराची वाडी,भुऱ्याची वाडी येथे पद्माकर पारधी यांनी सहकार्य केले. वनवासीकल्याण आश्रमाचे अद्वैत ठाकूर, कुणाल शिसोदिया आणि सोहम दर्ने यांचे आदिवासी बांधवांचे तोंड गोड करण्यासाठी विशेष सहकार्य लाभले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE