नितलसच्या उपसरपंचपदी निवड झालेल्या देवेंद्र दरे यांचा मनसेतर्फे सत्कार

उरण दि 14(विठ्ठल ममताबादे ) : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशावरून तसेच रामदास पाटील पनवेल तालुका अध्यक्ष मनसे, अरविंद पाटील वावंजे विभाग अध्यक्ष मनसे,यांच्या नेतृत्वाखालील पनवेल तालुक्यातील झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत देवेंद्र सुदाम दरे यांचे नितलस ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाली. देवेंद्र दरे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल मनसेचे उपसरपंच देवेंद्र दरे यांचा पनवेल तालुकाप्रमुख रामदास पाटील यांनी सत्कार केला.

मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांची तोफ महाराष्ट्रातील होणाऱ्या निवडणुकांमध्ये धडाडेल.मनसे पुढाकार घेणार आणि आघाडी मारणार ग्रामपंचायतीचा विकास हाच आमचा ध्यास आणि तो लोकांना जनतेला आवडेल हीच आमची अपेक्षा असे मत रामदास पाटील यांनी व्यक्त केले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE