इंद्रधनु रंगावली प्रदर्शनातील कलाकारांची पालकमंत्र्यांकडून प्रशंसा

रत्नागिरी : येथे सुरू असलेल्या इंद्रधनु रंगावली प्रदर्शन २०२३  या रांगोळी प्रदर्शनाला राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान पालकमंत्र्यांनी एका पेक्षा एक कलाकृती साकारलेल्या रांगोळी कलाकारांच्या पाठीवर त्यांनी कौतुकाची थाप मारली.

जागतिक किर्तीचे रांगोळीकार राहुल कळंबटे यांच्या समवेत निखील कांबळे, समिधा रसाळ, कुणाल किर, अजय पारकर, कौस्तुभ सुतार, गुरूप्रसाद देवघरकर, प्रविण वेळणस्कर, विलास रहाटे, रोहित कोकरे, अक्षय वहाळकर, तेजस गोसावी, केदार टेमकर, सचिन अवसरे, अभिजीत सूर्यवंशी, विशाल चौघुले, विकास नांदिवडेकर, योगेश पाटील, पंकज पाटील या कलाकारांनी प्रदर्शनात आपली कला सादर केली असून प्रदर्शनामध्ये  3D  रांगोळी, व्यक्तिचित्र रांगोळी, सामाजिक विषय, रत्नागिरीतील प्रसिद्ध स्थळे अशा विविध प्रकारच्या ३५ विलोभनीय कलाकृती सादर केल्या आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE