रत्नागिरी जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा २७ ते २९ नोव्हेंबरला


रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी यांच्या प्रशासकीय, तांत्रिक व आर्थिक सहकार्याने जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट (१४,१७,१९ वर्षाखालील मुले व मुली) स्पर्धेचे प्रमोद महाजन क्रीडा संकुलात आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धां १४ वर्षांआतील मुले व मुली साठी २७ नोव्हेंबर रोजी, १७ वर्षांआतील मुले व मुली २८ नोव्हेंबर रोजी तर १९ वर्षांआतील मुले व मुली २९ नोव्हेंबर रोजी प्रमोद महाजन क्रीडा संकुलात स्पर्धेंचे आयोजन करण्यात येणार आहे.


अधिक माहितीकरिता टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव सिद्धेश गुरव ८७७९६६९४९६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्र. जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.


शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई द्वारा नव्याने मान्यता दिलेल्या खेळांच्या क्रीडा स्पर्धा आयोजनास शासकीय योजनांचे लाभ ५% खेळाडू आरक्षण, क्रीडा गुण सवलत, शिष्यवृत्ती, रोख पारीतोषिके अनुज्ञेय असणार नाहीत, याची नोंद सर्व खेळाडू, क्रीडा शिक्षक,पालक यांनी घ्यावी.


स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता विहित नमुन्यातील स्पर्धा प्रवेशिका, खेळाडू ओळखपत्र इ. आवश्यक कागदपत्रांसह स्पर्धा ठिकाणी उपस्थित रहावे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE