नवीन शेवा येथील भोईर आळी मित्र मंडळाच्या वार्षिक कार्यक्रमात विविध स्पर्धा
माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची बक्षीस समारंभास प्रमुख उपस्थिती
उरण दि १९ (विठ्ठल ममताबादे ) : सन १९९३ रोजी स्थापन करण्यात आलेल्या उरण तालुक्यातील नवीन शेवा गावातील भोईर आळी मित्र मंडळाचा ३० वा वार्षिक कार्यक्रम १७ व १८ डिसेंबर २०२३ रोजी संपन्न झाला. या वेळी श्री सत्यनारायण ची महापुजा आयोजित करण्यात आली होती. तर विविध क्रीडा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व महिलांसाठी चला खेळ खेळूया पाठणीचा हया स्पर्धा व प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांच्या सौजन्याने जल्लोष सुवर्ण युगाचा हा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभासाठी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्याच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले, तसेच मार्गदर्शन करताना माजी आमदार मनोहरशेठ भोईर म्हणाले की, भोईर आळी मित्र मंडळाला आज तीस वर्षे पूर्ण झाली आहेत.आणि त्यांनी या वर्षात विविध असे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपलेली आहे आणि मला खात्री आहे की हा मंडळ निश्चितच पन्नास वर्षे पूर्ण करेल, म्हणून माझे जे जे सहकार्य तुम्हाला लागेल ते मी तुम्हाला देईल असे आश्वासित केले, यावेळी उपतालुकाप्रमुख व गावचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मंडळाचे संस्थापक सदस्य व उरण संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे यांनी केले.
या कार्यक्रमास द्रोणागिरी शहरप्रमुख जगजीवन भोईर, एम आय पी एल चे व्यवस्थापक श्री दयाळशेठ भोईर, सरपंच सोनल घरत, उपसरपंच कुंदन भोईर, ग्रामपंचायत सदस्य मयुरी घरत, रेखा म्हात्रे, सतिश सुतार, भावना भोईर, अशोक दर्णे, प्रणिता भोईर, वैशाली म्हात्रे शाखाप्रमुख शैलेश भोईर,पंकज सुतार, गावचे खजिनदार भारत भोईर, सेक्रेटरी शेखर पडते, महेश म्हात्रे, अशोक म्हात्रे व मान्यवरा उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भोईर आळी मित्र मंडळाचे कार्यकर्ते परशुराम ठाकूर, अजय सुतार, जनार्धन भोईर,एकनाथ भोईर, हिराजी ठाकूर, मोरेश्वर भोईर,दामाजी भोईर, विजय म्हात्रे, लहू पाटील,लैलेश भोईर, भालचंद्र भोईर, जगदीश भोईर, रोशन भोईर, अक्षय भोईर, भुपेंद्र भोईर, भावेश भोईर, यज्ञेश भोईर, भगवान भोईर, रघुनाथ भोईर, मुकेश म्हात्रे, नवीन भोईर, मंगेश म्हात्रे, राकेश भोईर, किरण भोईर, काशिनाथ भोईर, महिला कार्यकर्त्या वैशाली भोईर, प्रतिभा भोईर, सुरेखा भोईर,शुभांगी भोईर, नयना ठाकूर, रंजना म्हात्रे, वंदना पाटील, देवयानी भोईर, सोनी भोईर व भोईर आळी ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली.