रत्नागिरी : पाली (जि.रत्नागिरी) येथील ईव्ही चार्जिंग सेंटरचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हस्ते करण्यात आले. यावेळी स्थानिक सरपंच विठ्ठल सावंत, वैभव पाटील, मृणाल पाटील, वेदांत पाटील, विलास पाटील, वैशाली पाटील आदी उपस्थित होते.

काळाची पावलं ओळखून पर्यावरणपूरक वाहनांचा अवलंब जगभर केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून विजेवर चार्ज होणारी वाहने रस्त्यावर धावू लागली आहेत. यामुळे पेट्रोल डिझेल पंपाप्रमाणे विजेवर चार्ज होणाऱ्या वाहनांकरिता चार्जिंग स्टेशनची उपयुक्तता लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील पाली येथे ईवव्ही चार्जिंग सेंटर सुरू करण्यात आले आहे.
राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी-रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पाली येथे सुरू करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग सेंटरचे उद्घाटन केले.
