दिवा : शिवसेना दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या पुढाकाराने आणि धर्मवीर मित्र मंडळ आयोजित ‘दिवा महोत्सव – २०२३’ अत्यंत उत्साहात सुरू आहे. या महोत्सवाला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सदिच्छा भेट दिली.

गेल्या पंधरा वर्षांपासून दिवा महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जात आहे. या प्रसंगी शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, कल्याण शहर प्रमुख महेश पाटील, दिवा उपशहर प्रमुख आदेश भगत यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.














