नवघर ग्रामस्थांचे विविध मागण्यासाठी उद्यापासून धरणे आंदोलन
उरण (विठ्ठल ममताबादे ): मु.नवघर ता.उरण जिल्हा रायगड येथे रेल्वेचे गोपनीय अधिकारी भगवान लेंडे आणि विजय कुमार यांनी नवघर ग्रामस्थांची भेट घेतली.दिनांक 06 जून 2022 रोजी होणा-या धरणे आंदोलन संदर्भात त्यांनी मागण्या जाणून घेतल्या.१) रेल्वे क्राॅसिंग पर्यायी रस्ता२)नवघर रेल्वे स्टेशन नाव देण्यात यावे३)तसेच मौजे नवघर येथे होणा-या रेल्वे स्टेशन मध्ये निर्माण होणा-या नोक-या आणि व्यवसायामध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे.या मागण्यांसाठी नवघर ग्रामस्थांनी धरणे आंदोलन पुकारण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.पुकारलेल्या धरणे आंदोलना संदर्भात चर्चा शासनाच्या अधिकाऱ्यांना नवघर ग्रामस्थांनी येथील समस्या समजावून सांगितल्या तसेच आम्हा नवघर ग्रामस्थांना तशी लेखी हमी द्यावी असे सांगीतले असता या सर्व समस्या योग्य असून आम्ही योग्य अहवाल वरिष्ठानां कळवून योग्य तो मार्ग काढू असे रेल्वेचे गोपनीय अधिकारी यांनी भेटी दरम्यान आश्वासन दिले असता ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.तरीपण जो पर्यत संबंधित अधिकारी लेखी हमी देत नाहीत तोपर्यंत हे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी केला आहे. दिनांक 06 जून 2022 पासून ठरल्या प्रमाणे सिडको कार्यालय द्रोणागिरी बोकडवीरा उरण येथे धरणे आंदोलन करण्याचा निर्धार नवघर ग्रामस्थांनी सदर अधिका-यां समोर केला. यावेळी जेष्ठ नागरिक संघटने सुरेश तांडेल,रायगड भुषण प्रा.एल.बी.पाटील,नवघर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाटील,नवघरचे माजी अध्यक्ष योगेश तांडेल,ग्रामस्थ मंडळाचे सेक्रटरी समाधान तांडेल,जेष्ठ नागरिक मोतीराम डाके उपस्थित होते.