आम्रराज हापूस प्रथमच जलमार्गाने अमेरिकेला रवाना !
भारतीय आंबा निर्यातीत ऐतिहासिक क्षण
रत्नागिरी : भारतीय आंबा प्रथमच समुद्रमार्गे अमेरिकेत रवाना झाला आहे. भारतीय आंब्याच्या निर्यातीमधील हा ऐतिहासिक क्षण असल्याचे राज्याचे पणन संचालक तथा महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी सांगितले.
दि.भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, अपेडा आणी सानप ॲग्रोॲनिमल्स प्रा. लि. यांच्या वतीने कृषि पणन मंडळाच्या वाशी येथील विकीरण सुविधा केंद्र येथुन अमेरिकेला देशातुन प्रथमच आंब्याची समुद्रमार्गे निर्यात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमास भाभा ॲटोमिक रेसर्च सेंटरच्या बायोसायन्स विभागाचे संचालक डॉ. टी. के. घंटी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते.
आंब्याच्या समुद्रमार्गे निर्यातीमुळे आंब्याचा वाहतुक खर्च 10 टक्क्यावर येणार असुन त्यामुळे अमेरीकेतील बाजारपेठेत भारतीय आंबा स्पर्धात्मकरित्या उतरुन इतर देशांतील आंब्याशी स्पर्धा करु शकेल, तसेच समुद्रमार्गे निर्यातीमुळे आंबा सुमारे दिड महिन्याच्या जादा कालावधीसाठी तेथील बाजारपेठेत राहील.