पुरुष व महिला राज्य निवड समिती सदस्यपदी चिपळूणचे प्रशांत देवळेकर
रत्नागिरी : राष्ट्रीयस्तरावरील फेडरेशन चषक स्पर्धेत महिला गटासाठी रत्नागिरीचे राजेश कळंबटे यांची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून तर पुरुष व महिला राज्य निवड समिती सदस्यपदी चिपळूणचे प्रशांत देवळेकर यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने 2022-23 या वर्षासाठी सर्व गटांच्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा जाहीर केल्या आहेत. तसेच संघ निवड करणार्या समिती सदस्य, राज्य खो-खो संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक, फिजिओ यांची घोषणा असोसिएशनचे सचिव गोविंद शर्मा यांनी केली. राज्य असोसिएशनने निर्णयानुसार किशोर-किशोरी (१४ वर्षांखालील) राज्य स्पर्धा रत्नागिरी तेथे येत्या सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे