मुंबई : महाराष्ट्र सरकार आणि आर्सेलर मित्तल निपॉन समूह यांच्यात ४० हजार कोटींच्या सामंजस्य करार करण्यात आला आहे.
निपॉन समूहासोबतच्या या कराराप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते.
या महत्वपूर्ण करारामुळे महाराष्ट्रात २०००० युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यावेळी प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, सीईओ विपीन शर्मा, AMNS कंपनीचे Alain Legrix, Kubota San, रंजन धार, हृषीकेश कामत, आलोक मेहता,राजेंद्र तोंडपुरकर आदी उपस्थित होते.














