https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

दहावी परीक्षेच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेशपत्रे उपलब्ध

0 96

रत्नागिरी : माध्यमिक शाळांना मार्च 2024 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी ) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर बुधवार दि. ३१ जानेवारी २०२४ पासून school login मध्ये download करण्याकरिता उपलब्ध झाली आहेत. तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. असे आवाहन राज्य मंडळ पुणे सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

मार्च २०२४ मधील इ. १० वी परीक्षेसाठीसाठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी इ. १० वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत.प्रवेशपत्र (Hall Ticket) उघडताना (Open) काही त्रुटी (Error) आल्वास सदर प्रवेशपत्र Google Chrome मध्ये उघडावे.प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने प्रिंट करून देताना विद्याथ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये, सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्रामध्ये (Hall Ticket) विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यावयाच्या आहेत. प्रवेशपत्रावरील (Hall Ticket) फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख व जन्मस्थळ या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावयाची आहे.

फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे.प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुनःश्च प्रिंट कातून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावयाचे आहे.

मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक तसेच सर्व माध्यमिक शाळा यांनी नोंद घेऊन त्याप्रमाणे योग्य कार्यवाही करावी.असे ही कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.