https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सीएचए आधार चषकाचे आयोजन

0 156

उरण दि ७( विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यात अनेक अपघात होत असतात व या अपघातांमुळे सर्वसामान्य असलेल्या अनेक गोरगरिबांचे प्राण गेले आहेत.अपघात प्रसंगी गोरगरिबांना खूप मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. अशा वेळी अपघातग्रस्त कुटुंबाचे मानसिक खच्चीकरणही खूप मोठया प्रमाणात होते. अपघातग्रस्त कुटुंबाला कोणी मदत करताना दिसून येत नाही. ट्रान्सपोर्ट क्षेत्रात सर्वेचे काम करणाऱ्या व ट्रक, कंटेनर, मालवाहतूक टेम्पो आदी अवजड वाहनांची कागदपत्रे तपासून योग्य जागी माल उतरविण्यासाठी मदत करणाऱ्या बांधवांना CHA(कस्टम हाऊस एजेंट )असे म्हणतात.

उरण तालुक्यात स्थानिक भूमीपूत्र असलेले मराठी व्यक्ती या क्षेत्रात खूप मोठया प्रमाणात आहेत. उरण तालुक्यात असे सीएचए चे काम करणाऱ्या कामगार वर्गांना सतत फिरत काम करावे लागत असल्याने त्यांना अपघाताचा धोका जास्त आहे. अनेक सीएचए बांधवांचे उरण मध्ये अपघात देखील झाले आहेत. अश्या सीएचए बांधवांना कोणाचा आधार नसतो. दिवसभर काम करून जो पगार मिळतो त्यातच आपला संसार कसा बसा चालवावा लागतो. कठीण प्रसंगात सीएचए बांधवांना कोणाचा आधार नसतो.सीएचए बांधवांना कधी १२ तास तर कधी २४ तास काम करावे लागते.त्यामुळे उरण तालुक्यातील पूर्व विभागातील सतत होत असलेल्या अपघातग्रस्त सीएचए बंधूंच्या मदतीसाठी व समाजातील ईतर अपघातग्रस्तांना निधी उपलब्ध व्हावा या दृष्टीकोणातून न्हावा शेवा सीएचए आधार सामाजिक संस्थे तर्फे दरवर्षी सीएचए आधार चषकाचे आयोजन करण्यात येते याही वर्षी रविवार दि.११ फेब्रुवारी २०२४ रोजी मायमाऊली अक्कादेवी मैदान मोठीजुई , तालुका-उरण येथे एक दिवसीय सीएचए आधार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

उरण तालुक्यातील अपघातग्रस्त सीएचए बधूंच्या आर्थिक मदतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या सीएचए आधार चषकाला मान्यवर, खेळाडू, रसिक प्रेषक वर्गांचा खूप मोठा प्रतिसाद मिळत असतो.अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करणारी न्हावा शेवा सीएचए आधार सामाजिक संस्था ही महाराष्ट्रातील एकमेव संघटना असून क्रिकेट क्षेत्रात या न्हावा शेवा सीएचए आधार सामाजिक संस्थेने एक नवा आदर्श समाजासमोर, खेळाडूंसमोर, क्रीडा रसिक प्रेषकांसमोर उभा केला आहे.अशा या सीएचए आधार चषकाला रसिक प्रेषक, खेळाडूंनी, विविध प्रतिष्ठित मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन न्हावा शेवा सीएचए आधार सामाजिक संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.