रत्नागिरी, १०: जिल्ह्यातील माहे फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे बाधित शेतकऱ्यांना ३ महिन्याची व्याजमाफी सन २०१५-१६ या वर्षातील पीक कर्जाचे रुपांतरित कर्जावरील सन २०१५-१६ या वर्षाचे संपूर्ण व्याज व पुढील चार वर्षांचे ६% दराने व्याज शासनामार्फत अदा करण्याबाबत बँकांकडील प्राप्त प्रस्तावानुसार पात्र / अपात्र शेतकऱ्यांची यादी बॅंका, संबंधित तालुका सहायक निबंधक सहकारी संस्था, तलाठी सजा व ग्रामपंचायतींमध्ये प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांना काही हरकती, सूचना असल्यास १५ फेब्रुवारीपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी केले आहे.
बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, आय.डी.एफ.सी.बँक, आय.सी.आय.सी.आय.बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक, आंध्रा बँक, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, इंडियन बँक, इंडियन ओवरसिज बँक, पंजाब नॅशनल बँक, सिंडीकेट बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँकांचा समावेश आहे.
खातेधारकांच्या हरकती / सूचना असल्यास त्या संबंधित बँकेमध्ये दि. १५ फेब्रुवारीपर्यंत करावयाच्या आहेत. त्यांनतर आलेल्या हरकती / सूचनांचा विचार केला जाणार नाही, असे ही कळविले आहे.