राज्यस्तरीय स्पर्धेत गोशिन रियू कराटेच्या विद्यार्थ्यांचे सुयश
उरण (विठ्ठल ममताबादे ) : राज्यस्तरीय २४ वी शितो रीयू कराटे असोसिएशन तर्फे राज्यस्तरीय कराटे स्पर्धा अलिबाग येथे घेण्यात आले होते. यामध्ये गोशीन रियू कराटेच्या विद्यार्थिनीनी विविध वजनी गटात पदके पटकावली.
वेदा पाटील गोल्ड मेडल, हृदवी म्हात्रे एक गोल्ड मेडल एक सिल्वर मेडल, दीक्षांत उबाळे एक ब्राँझ मेडल, श्रेयश कांबळे एक गोल्ड मेडल, दिव्या भारद्वाज दोन ब्रॉन्झ मेडल, हीर सेन एक गोल्ड एक एक ब्रॉन्झ मेडल, प्रत्युषा पाटील एक सिल्वर मेडल, प्रसिद्धी आल्हाद दोन गोल्ड मेडल,मनस्वी कोळी दोन गोल्ड मेडल, साईश वाल्मिकी एक सिल्वर एक ब्रॉन्झ मेडल, अनय पाटील गोल्ड मेडल एक सिल्वर मेडल,वेदा ठाकरे दोन गोल्ड मेडल ही पदके पटकावली. मनस्वी कोळी हिला बेस्ट फायटर किताब देण्यात आला. एकूण ११ गोल्ड मेडल, ४ सिलव्हर ५ ब्रॉन्झ पदक मिळाले.या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून साडेतीनशे विद्यार्थी आले होते.
ही स्पर्धा शहाण राहुल तावडे यांनी भरवली होती. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन म्हणून सिहाल राजू कोळी, इंडिया प्रेसिडेंट, गोपाळ म्हात्रे, परेश पावसकर अमिषा घरात, अमिषा घरात, सुलभाकोली यांनी केले. आणि पंच शिहान कैलास रबडे, शिहानिनाथ बोरकर, शिहान,कवळे सर, सिंहासनी खेडेकर, वरसोलकर सर, सिंहा नितीन मोहिते,सिंहांन चेतनसाखरे, सिहान सतीश कुलकर्णी, शिहान मतीवानंद यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.