बालसाहित्याच्या हस्तलिखिताचे प्रकाशन
लांजा : कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा लांजा व ज. गं. पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन तळवडे येथे उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला कोमसाप लांजा शाखेच्या उपाध्यक्ष डॉ. माया तिरमारे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी व्यासपीठावर कोमसाप लांजा शाखेचे अध्यक्ष रामचंद्र जाधव, माजी मुख्याध्यापक भिमराव खोत, मुख्याख्यापक दादासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्वरचित व संकलित बाल साहित्याच्या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हस्तलिखित निर्मितीसाठी विद्यार्थ्यांना शिक्षिका ऋतुजा राणे यांनी मार्गदर्शन केले. गौरव दिनाच्या निमित्ताने विद्यार्थी श्रवण कांबळे, अंश कांबळे, हिमांशू पाटोळे, निखिल शिंदे, श्रीराम लांजेकर तसेच डॉ. माया तिरमारे, भिमराव खोत यांनी मनोगत व्यकत केले.
कार्यक्रमाला कोमसाप सदस्या सुरेखा विभुते, प्रभाकर सनगरे, प्रकाश हर्चेकर, नेहा पाटोळे, गणेश झोरे, स्वरा वासुरकर, स्नेहा कोत्रे, पद्मिनी कांबळे, ऋतुजा राणे, शुभम पाटोळे, अविनाश चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा पाटोळे यांनी केले तर आभार पद्मिनी कांबळे यांनी मानले.
