‘एक जिल्हा एक उत्पादन’ पुस्तकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : उद्योग विभागाच्या “एक जिल्हा एक उत्पादन” ( ODOP) पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह ना. छगन भुजबळ, ना. सुरेश खाडे, ना. चंद्रकांतदादा पाटील,ना.दादा भुसे, ना. दीपक केसरकर, ना. मंगलप्रभात लोढा, ना.अनिल पाटील, ना.दिलीप वळसे पाटील, ना.अब्दुल सत्तार, ना.संजय बनसोडे, ना. अदिती तटकरे, मुख्य सचिव नितीन करीर, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित होते.