https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

सोशल मीडियावर अपशब्द वापरल्याबद्दल संबंधितावर गुन्हा दाखल करावा

0 737

उरण तालुका ब्राह्मण समाजाची मागणी

उरण दि ३ (विठ्ठल ममताबादे ) : सोशल मीडियावर एका व्यक्तीने ब्राह्मण समाजाबद्दल अपशब्द वापरत ब्राह्मण समाजाला संपवून टाकू असे अपशब्द वापरल्याबद्दल उरण तालुका ब्राह्मण समाजतर्फे दि. २/३/२०२४ रोजी उरणमध्ये निषेध नोंदविण्यात आला. युट्यूब चॅनलवर ब्राह्मण समाजाबाबत असे बेताल वक्तव्य करून सामाजिक सलोखा बिघडण्यास कारणीभूत असणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दिनांक २/३/२०२४ रोजी उरण ब्राह्मण समाजबांधवांतर्फे उरण पोलीस स्टेशनला तसेच तहसीलदार उद्धव कदम यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी ब्राह्मण सभा उरणचे विराम उपाध्ये, उपाध्यक्ष अनिल दाते, खजिनदार हेमंत धामणकर, सचिव वैभव राईलकर, कार्यकारिणी सदस्य धनंजय उपाध्ये तसेच महिला मंडळ कार्यकारिणी सदस्य श्रीमती नंदीनी राईलकर, श्रीमती मृणाल उपाध्ये, श्रीमती नेहा उपाध्ये,दर्शना देशमुख तसेच मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण समाजबांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.