श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे उद्या धर्मवीर बलिदान मासानिमित्त श्रीनिवास पेंडसे यांचे व्याख्यान
रत्नागिरी : फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन आमावस्या म्हणजेच १० मार्च ते ८ एप्रिल २०२४ या दरम्यान श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी व सर्व शिवशंभु पाईक संभाजी राजांच्या मृत्यु प्रित्यर्थ ‘धर्मवीर बलिदान मास’ पाळतात. यानिमित्त कोरगाव येथे येथे प्रसिद्ध व्याख्याते श्रीनिवास पेंडसे यांचे व्याख्यान रविवार दिनांक 10 मार्च रोजी आयोजित करण्यात आले आहे
या मासामधेच संभाजी महाराजांचे अत्यत क्रूर पध्दतीने हाल हाल करुन त्यांची फाल्गुन अमावस्येला तुळापुर येथे हत्या करण्यात आली तेच दुख त्यांची प्रजा पाळताना पूर्ण मास हे सुतक पाळते याच अनुषंगाने हिंदु समाजामधे जागृती व्हावी त्यांच्यापर्यंत संभाजी राजे पोहचावेत किंबहुना संभाजी राजांमुळेच आज हिंदुस्थानातिल हिंदु समाज शिल्लक आहे याची जाणीव होण्यासाठी हे व्याख्यान कुवारबाव येथील बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या शेजारील पाण्याच्या टाकिजवळ असणाऱ्या मैदानावर सायंकाळी ७:०० वाजता आयोजित करण्यात आले आहे.
या व्याख्यानाला सर्व धर्माभिमानी, शिवशंभू पाईकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीच्या वतिने करण्यात येत आहे.