- जनतेची काम न करणाऱ्यांना स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्टाईलने उत्तर देणार : ऍड वणजू
रत्नागिरी : राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव अॅड. श्री बंटी वणजू यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजितदादा पवार गट) रत्नागिरी तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील युवा नेते म्हणून त्यांनी जनतेच्या न्याय्य हक्कासाठी अनेक आंदोलले केली आहेत. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची तालुकाध्यक्षपदी झालेली निवड ही त्यांनी केलेल्या जनतेच्या कामांची पोचपावतीच मानली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रत्नागिरी तालुक्याची जबाबदारी अॅड श्री बंटी वणजू यांच्यावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष आणि रत्नागिरी रायगडचे खासदार सुनील तटकरे, आमदार आदिती तटकरे, चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघांचे आमदार शेखर निकम, विधानपरिषद आमदार अनिकेतदादा तटकरे, प्रदेश सचिव श्बाप्पा सावंत, प्रदेश सरचिटणीस आणि सिंधु-रत्न सदस्य तसेच प्रदेश सरचिटणीस श्री अजित यशवंतराव रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) जिल्हाध्यक्ष श्री बाबाजी जाधव यांनी सोपविली आहे.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री बाबाजी जाधव यांचे कडुन तालुकाध्यक्ष पदाचे पत्र घेताना अॅड श्री बंटी वणजू, शाम्भवी वणजू, प्रदेश सचिव श्री बाप्पा सावंत, सिंधु-रत्न सदस्य तसेच प्रदेश सरचिटणीस श्री अजित यशवंतराव, जिल्हा उपाध्यक्ष श्री नारायण खोराटे, पप्पु तोडणकर, प्रणित चव्हाण, राकेश आंब्रे, नितीन रोडे निलेश खोराटे आदी उपस्थित होते.
या पुढे भाजप शिवसेना (शिंदे गट) यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करू आणि जो जनतेचे काम करणार नाही त्याला कै. आनंद दिघे यांच्या स्टाईलने उत्तर देऊ आणि जनतेसाठी कायम रस्त्यावर उतरु आणि गाव तिथे राष्ट्रवादी काँग्रेस शाखा निर्माण करू, असे प्रतिपादन नवनियुक्त तालुकाध्यक्ष अध्यक्ष
-अॅड. श्री बंटी वणजू, राष्ट्रवादी काँग्रेस रत्नागिरी तालुकाध्यक्ष.
यावेळी नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष अॅड श्री बंटी वणजू यांनी रत्नागिरी तालुक्याचीही कार्यकारिणी जाहीर केली. त्यामध्ये तालुका उपाध्यक्ष पप्पु तोडणकर, तालुका उपाध्यक्ष कैलास आडवीलकर शहर अध्यक्ष मंदार नैकर, शहर कार्याध्यक्ष मुबीन शहा, शहर उपाध्यक्ष राकेश आंब्रे,महिला तालुका सौ संध्या नाईक, महिला शहर अध्यक्ष सौ प्रणिता कोतवडेकर, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष ताजुद्दीन खलिपे,अल्पसंख्यांक शहरअध्यक्ष राहील मुकादम, सरचिटणीस फारूक शहा युवक विधानसभा क्षेत्राध्यक्ष निलेश खोराटे यांनाही नियुक्ती पत्र देण्यात आली.
