सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल जाहीर ; भक्ती गोरे, ऋग्वेद बोडस ठरले टॅबचे मानकरी!

लांजा : युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ -सांगवे व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर नुकतीच जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ओवी प्रथमेश आंबेकर, आर्या विशाल , राजवीर बिराप्पा कुरणी,भक्ती दत्ताराम गोरे आणि ऋग्वेद रुपेश बोडस यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

ऋग्वेद बोडस
भक्ती गोरे
राजवीर कुरणी

ही परीक्षा इयत्ता २री ,३री, ४थी,६वी व ७ वी साठी  मराठी व सेमी इंग्रजी माध्यमात रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आली होती.

या परिक्षेत रत्नागिरी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत इयत्तानिहाय  स्थान पटकाविलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे :

आर्या मोरे
  •  इ.२ री .. १)ओवी प्रथमेश आंबेकर  (ल.ग.प.रत्नागिरी), २) रोशनी संजय मालपेकर (ओझर नं.१) , ३)विराज रितेश धायगुडे ( ल.ग.प.रत्नागिरी), ४) सार्थक संदीप मोरे ( जवळेथर) ५) वेदांत मुकुंद फड ( लांजा नं.५)
  • इ.३री १) आर्या विशाल मोरे (ल.ग.प.रत्नागिरी), २) चैतन्य संजय चौगुले (खरवते) ३) रोहन अमर घोसाळकर (ल.ग.प.रत्नागिरी),  ४) वैष्णवी शैलेश प्रभूदेसाई (ल.ग.प.रत्नागिरी), ५) निशा केदार मांडवकर (ल.ग.प.रत्नागिरी).
  • इ.४ थी. १) राजवीर बिराप्पा कुरणी ( लांजा नं.५) २) श्रीपाद विठोबा चव्हाण ( येळवण नं. १) ३) स्वानंद राहुल सिनकर ( लांजा नं.५) ४) धनश्री दीपक गुरव ( पावस गुरववाडी) ५) भूमी दीपक गोठणकर (ल.ग.प.रत्नागिरी).
  • इ.६वी १) भक्ती दत्ताराम गोरे ( लांजा हायस्कूल), २) स्वस्तिक सत्यवान कुवळेकर ( पाचल हायस्कूल) ३) धनुष्का धनाजी हजारे ( लांजा हायस्कूल), ४) अवधूत संजय दळवी ( पाचल हायस्कूल) ५) स्वरा मंगेश पुसाळकर ( तोणदे सोमेश्वर) 
  • इ.७ वी १) ऋग्वेद रुपेश बोडस ( लांजा हायस्कूल), २) आश्लेषा विशाल घोलप ( पाचल हायस्कूल) ३) अगस्त्य संजय खंदारे ( लांजा हायस्कूल), ४) सुमेद सचिन जाधव ( शिरवली) ५) प्रांजली किशोर मानकर ( लांजा हायस्कूल),
ओवी आंबेकर

इ.२ री ३री व ४ थी मधील प्रथम ५ गुणानुक्रमांकांना अनुक्रमे रोख रु. २०००,रु.१८००,रु.१२००, रु.१००० आणि  इ.६वी ७वी मधील प्रथम ५ गुणानुक्रमांकांना अनुक्रमे रु.२५००, रु.२०००, रु.१५००, रु.१२००, रु १००० व  सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे आणि तालुका गुणवत्ता यादीत प्रथम ३ गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके रुपये ७५०,५००व ४००, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. इ.६वी ७वी तील  जिल्ह्यातील प्रथम क्रमांकास टॅब मिळणार आहे. तसेच गुण १५२ ते २०० ला सुवर्ण पदक,१३२ ते १५०  रौप्यपदक, ११२ ते १३०  कांस्यपदक देऊन गौरविण्यात येणार आहे.    

सर्व विजेत्यांचे युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश सावंत व अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी अभिनंदन केले असून जूनमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना जाहीर कार्यक्रमात सन्मानित केले जाणार आहे, असे कळविले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE