युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती
चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण संकुलामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रस्तावनेतून प्रशालेतील शिक्षिका सौ.मेधा लोवलेकर यांनी डॉ.आंबेडकर यांच्या आयुष्याचा मागोवा घेतला. त्यानंतर युनायटेड च्या गुरुकुल विभागातील इयत्ता सहावी मधील कु.अवनी भुवड या विद्यार्थिनीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण तर गुरुकुलच्याच इयत्ता आठवीच्या वर्गांमधील कु.मैत्रेयी पराग पुरोहित आणि ओजस सतीश कुंटे या विद्यार्थ्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या कार्याचा मागोवा आपल्या मनोगतातून उपस्थितांसमोर मांडला.
प्रशालेतील कलाशिक्षक श्री.पराग लघाटे यांनी डॉ. आंबेडकरांचे ग्रंथप्रेम, त्यांची लेखन-साहित्य संपदा याविषयी माहिती मनोगतातून व्यक्त केली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.स्वप्नाली पाटील मॅडम यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार,अनेक क्षेत्रातील योगदान आणि आपले दैनंदिन कर्तव्य याची सांगड घालत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
ह्या कार्यक्रमाला प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. नाईक मॅडम, शिक्षक प्रतिनिधी सौ .चिमणे मॅडम,यु.इं.स्कूलचे उपमुख्याध्यापक श्री.संजय बनसोडे सर, पर्यवेक्षक श्री.मुंढेकर सर, शिक्षक प्रतिनिधी श्री. खाडे सर तसेच संकुलातील प्राथमिक माध्यमिक आणि शिशुविहार विभागातील सर्व अध्यापक आणि अध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील शिक्षिका सौ.प्राची भावे यांनी केले.