रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 15.22 मिमी पावसाची नोंद

रत्नागिरी :  जिल्ह्यात गुरुवार अखेर संपलेल्या 24 तासात सरासरी 15.22  मिमी तर एकूण 219.70 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 
        जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.   मंडणगड 00.00 मिमी , दापोली
07.00 मिमी, खेड 07.00 मिमी, गुहागर 0.00 मिमी, चिपळूण 0.00 मिमी, संगमेश्वर 60.00 मिमी, रत्नागिरी 06.00
मिमी, राजापूर 05.00 मिमी,लांजा 52.00 मिमी.
        जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 09 जुन 2022 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
दापोली तालुक्यात 08 जुन 2022 रोजी मौजे पिसई, ता. दापोली येथे फळबागेला वनवा लागून सहदेव
लक्ष्मण येसरे यांचे 200 काजू कलम नुकसान रक्कम रु. 20 हजार, अशोक भिकू येसरे यांचे 250 काजू कलम नुकसार रक्कम
रु. 30 हजार, दशरथ रामचंद्र येसरे यांचे 60 काजू कलम नुकसान रक्कम रु. 7 हजार 200 झाले आहे.
संगमेश्वर तालुक्यात 08 जुन 2022 रोजी मौजे मूरडव मेणेवाडी, ता. संगमेश्वर येथे रविंद्र नारायण नावले
यांच्या घरावर वीज पडून दोन कोंबडया मृत झाल्या, असे निवासी उपजिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी कळविले आहे

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE