पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नुकतेच जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचे शुभ आशीर्वाद घेतले. उभयतांमध्ये अर्धा तास चर्चा झाली.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज प्रवचन व दर्शन सोहळ्यानिमित्त जुन्या गोव्यात आहेत. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जगद्गुरू श्रींची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. गोवा मंत्रिमंडळाचे कार्य उत्कृष्ट असल्याचा गौरव जगद्गुरू नरेंदद्राचार्यजी महाराज यांनी यावेळी केला.
यापूर्वीही मुख्यमंत्री सावंत यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांचे दर्शन घेतले होते. आता ते दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यानंतर प्रथमच त्यांनी जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज यांचे दर्शन घेतले. संस्थानच्या गोवा येथे चाललेल्या उत्कृष्ट कार्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतले जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांचे आशीर्वाद
| कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती अवघ्या काही क्लिकवर वाचकांपर्यंत पोहोचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म |