रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, मडगाव मार्गे जाते केरळमध्ये
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे उन्हाळी हंगामासाठी सुरू करण्यात आलेली लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली ही वातानुकूलित विशेष गाडी (01463) उद्या दिनांक 2 मे रोजी सव्वा दोन तास उशिराने धावणार आहे.
निर्धारित वेळेनुसार ही गाडी (01463) मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून उद्या दिनांक 2 मे 2024 रोजी सायंकाळी 4:00 वाजता सुटणार होती. मात्र, कोचुवेली येथून येणारी कनेक्टेड गाडी विलंबाने धावत असल्यामुळे डाऊन दिशेने सुटणारी ही गाडी मुंबईतून गुरुवारी सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी सुटणार आहे. म्हणजेच निर्धारित वेळेपेक्षा ही गाडी सव्वा दोन तास उशिराने सुटणार आहे.
निर्धारित वेळेनुसार ही गाडी चिपळूण ला सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी तर रत्नागिरीला 45 मिनिटांनी येते. मात्र, दोन मे 2024 रोजी च्या प्रवासासाठी ही गाडी रिशेड्युल करण्यात आल्यामुळे सुटण्याच्या ठिकाणावरूनच ती सव्वा दोन तास उशिराने निघणार आहे.
- हे सुद्धा वाचा : मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराला प्रखर विरोध
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही मिळू लागली!
- कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावरून कंटेनरद्वारे मालवाहतुकीचा शुभारंभ
